खा उदयनराजे यांच्याकडून कराड पालिकेचे अभिनंदन स्वच्छ सर्वेक्षण सर्वेक्शन मध्ये सातारचा नंबर लागणार तरी कधी ?

56
Adv

भारत सरकार स्वच्छ सर्वेक्षण २०२०.कराड नगरपालिकेची अभिमानास्पद कामगिरी कराड नगरपालिका देशात नं – १.सर्व अधिकारी, कर्मचारी, नगराध्यक्ष, नगरसेवक सर्वांचे व कराडवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन..! अशा प्रकारचे अभिनंदन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे मात्र त्यांची सत्ता असलेल्या सातारा नगरपालिकेचा नंबर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कधी लागणार याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे टेंडरसाठी ,लक्ष्मी दर्शनासाठी नगरसेवक पदाधिकारी जशी चढाओढ करतात तशी चढाओढ सातारकरांच्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये केली तर नक्कीच बदल घडेल यात तिळमात्र शंका नाही

स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सातारा पालिकेचा नंबर आणायचा असेल तर सर्वांनी एकदिलाने काम करणे अपेक्षित आहे प्रत्यक्ष काम झाले तरच सातारापालिका ही स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात अव्वल ठरेल यात तिळमात्र शंका नाही दस्तुरखुद्द सातारा पालिकेच्या काही नगरसेवकांना स्वच्छ सर्वेक्षण ची माहिती दिली जात नसल्याचा आरोप गतवर्षी पालिकेच्या सभेमध्ये नगरसेवकांनी बोलून दाखवला होता सातारा पालिकेच्या कार्यक्षम आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी फक्त चांगले काम करून चालणार नाही त्यांना इतर सहकार्याची पदाधिकाऱ्यांची व नगरसेवकांची योग्य साथ मिळाली तर नक्कीच आपली पालिका ही देशात अव्वल ठरल्याशिवाय राहणार नाही.

दरवर्षी लाखो रुपये आपण स्वच्छ सर्वेक्षण वरती खर्च करतो स्वच्छ सर्वेक्षण ही जबाबदारी फक्त आरोग्य विभागाची नसून पूर्ण पालिकेची आहे त्यामुळे आरोग्य विभागाला इतर नगरसेवकांचे सहकार्य लाभले तर आपली पालिका नक्कीच अवल ठरेल असा विश्वास सातारकर नागरिकांना आहे.

आरोग्य विभागाची टीम बदलल्याने आरोग्य प्रमुख सुहास पवार आरोग्य निरीक्षक सतीश साखरे शैलेश अष्टेकर यांच्याकडून सातारकरांना खूप अपेक्षा आहेत नूतन आरोग्य प्रमुख व आरोग्य निरीक्षक यांना पालिकेचा चांगला अभ्यास असून याचा नक्कीच फायदा स्वच्छ सर्वेक्षणात होणार असल्याचेही आता दिसून येत आहे

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट काही दिवसांपूर्वी पुन्हा सातारा पालिकेत हजर झाले असले तरी त्यांना तीन वर्षाचा अनुभव सातारा नगरपालिकेचा आहे सर्व नगरसेवकांना एकत्र आणून मुख्याधिकारी अभिजित बापट स्वच्छ सर्वेक्षण मध्ये चांगले काम होईल असा विश्वास सातारकर नागरिकांना वाटू लागला आहे

Adv