लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वरळी येथील कार्यालय उद्या १२ तारखेपासून पुन्हा जनतेच्या सेवेत तयार झाले आहे. कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमास येताना हार-तुरे ऐवजी फक्त शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
वरळीच्या ‘शुभदा’ बिल्डींग मधील मुंडे साहेबांच्या कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले असून उद्यापासून पुन्हा ते जनतेच्या सेवेत तयार असणार आहे. उद्या सकाळी ११ वा. राज्याच्या काना कोप-यातून नेते, पदाधिकारी, विविध संस्थांचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत.
*पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*
———————————
उद्याच्या कार्यक्रमाविषयी पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करताना म्हटले आहे की,
खूप उत्साह आहे लोकांत.. कार्यालय उदघाटनाचा.. इतका की, दोन दिवसापूर्वी च लोक यायला लागले ..उद्या सर्व जण या ११ वाजता..कोणीही फुलं -हारं, शाल – सत्कार काहीही घेऊन येऊ नका फक्त शुभेच्छा घेऊन या फक्त आशिर्वाद आणा..
••••