गोडोली येथील वनविभागाच्या नर्सरी शेजारील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याची मागणी

103
Adv

सातारा शहरातील गोडोली परिसरातील सर्वे नं ६९, गोडोली वनविभाग नर्सरी शेजारी वनविभागाचे कार्यालयाचे संरक्षक भिंती शेजारी व मुख्य रस्त्या लागत शासनाचे सुमारे ५ गुंठे जागेत पत्र्याचे शेड मारून काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. सदर जागा महाराष्ट्र शासनाने दिली असल्याचे भासवून गेली काही वर्षे अतिक्रमण धारकांनी त्या सरकारी जागेचा वापर वयैक्तिक हितासाठी केला आहे. या जागेचा ते कोणत्या हि प्रकारचा सरकारी महसूल भरत नसून ग्रामपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रात या जागेच्या मालकी हक्काची नोंद नसलेचे सामाजिक कार्यकत्रे किरण खरात यांनी निदर्शनास आणले आहे.

सदर अतिक्रमित जागा वनविभाग सातारा यांचेहि अखत्यारीत येत नसलेने हे अतिक्रमण हटविण्या संदर्भात किरण खरात यांनी मा. कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांचे कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तरी या संपूर्ण प्रकारची योग्य ती चौकशी करून हे अतिक्रमण हटविणेसाठी संबंधितांना नोटीस बजावून सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. आंबेकर यांनी दिली आहे.

Adv