पिंपोडे बुद्रुक: (प्रतिनिधी)
देशामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव असताना आपल्या स्वतःच्या जीवाची कसलीही काळजी न करता निर्भीडपणे जनहिताचे कार्य करणारे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख, डॉक्टर,पोलीस,शासकीय महसूल कर्मचारी,आशा स्वयंसेविका, यांचा केंद्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोना सारख्या महाभयंकर बिकट परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी 1 ते 5 या लॉक डाऊन मध्ये उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून संसर्गजन्य महाभयंकर रोगापासून लोकांना वाचविले. तसेच बाधित संख्या कमीत कमी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळवले. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा याकामी सज्ज होत्या त्यामध्ये आरोग्य यंत्रणा, महसूल खाते, पोलीस यंत्रणा,शिक्षक,आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक यांनी उस्फूर्तपणे आपल्या जीवाची तमा न बाळगता मैदानात उतरून जनतेची सेवा करून उत्तम कामगिरी केली. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला केंद्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री गोविंद मोरे. उपाध्यक्ष सचिन मोरे,तालुका उपाध्यक्ष सुभाष जाधव, विशाल भोसले,शिवाजी भोसले,अभिजीत लेंभे, दिगंबर नाचण, जलाल पठाण ,अमित बगाडे विजय दोरके आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Home Satara District Koregaon केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व डॉक्टर यांना कोरोना योद्धा...