पालिकेकडून घरपट्टी चे वाटप नागरिक घरपट्टी भरण्यासंदर्भात द्विधा मनस्थितीत वाचा सविस्तर

62
Adv

करोनाच्या काळात रखडलेल्या करवसुलीमुळे आर्थिक ओढाताण होऊ लागल्याने सातारा नगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीची बिले नागरिकांना देण्यास सुरवात केली आहे. त्यातून पाच दिवसांत पालिकेकडे 18 लाखांचा महसूल जमा झाला आहे.

करोनामुळे शासनाने घरपट्टी माफी देण्याबाबतचा प्रस्ताव सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करून पाठवावा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. मात्र, उदयनराजे यांची सत्ता असणाऱ्या सातारा पालिकेने नागरिकांना नगरपालिका अधिनियम 150 प्रमाणे घरपट्टी, नळपट्टीचे बिलवाटप सुरू केले आहे. शासनाने घरपट्टी माफ करावी या उदयनराजे यांच्या विधानाला फार काळ लोटलेला नाही. मात्र, उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सातारा पालिकेने तब्बल पस्तीस हजार घरपट्टीची तर दहा हजार नळपट्टीची बिले तयार ठेवली आहेत.

घरपट्टी माफ ची घोषणा केली गेली ती अमलात आणून सातारकरांना घरपट्टी तून मुक्त करावे अन्यथा बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे ठरेल अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अशोक मोने यांनी सातारानामाशी बोलताना दिली

साताऱ्यातील दोन ते तीन मोठे बडे देहेनडे यांची घरपट्टी जरी पालिकेने वसूल केली तरी ती कोटीच्या घरात जाईल सातारकर नागरिकांना थोडा घरपट्टी भरण्यास वेळ मिळेल पालिका प्रशासनाने थकलेल्या मोठ्या थकबाकीदारांकडून घरपट्टी वसूल करावी एवढीच अपेक्षा असल्याचे मत भाजपच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारकरांची घरपट्टी माफ व्हावी असे म्हटले आहे खरे पण कोरोनामुळे जनरल बॉडी ची सभा झाली नसल्याने तो विषय मंजूर झाला नसून लवकरच विषय मंजूर करून आम्ही शासनाकडे पाठविणार आहे तोपर्यंत सातारकरांनी घरपट्टी भरू नये असे मत माजी नगराध्यक्ष व सातारा विकास आघाडीचे नगरसेवक निशांत पाटील यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

Adv