कोट्यावधी रुपये खर्च करून घेतलेल्या सातारा पालिकेने घंटागाड्या आता गंजू लागले आहेत याकडे कुणाचे लक्ष नसून त्या सडल्यावर सातारकरांच्या सेवेत आणणार का हा खरा प्रश्न उभा राहिला आहे
सातारा पालिकेने दिनांक 2.6 ,2019 रोजी प्रत्येक प्रभागाला दोन घंटागाड्या अशा मिळून एकूण 40 घंटागाड्या पालिकेने खरेदी केलया असून गेल्या सहा महिन्यापासून त्यांना गंज लागला असल्याचे दिसून येते लागलेल्या गंजास जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे सातारकरांच्या करातून जमा झालेला पैसा याची चेष्टाच लावल्याचे आरोग्य विभागाकडून दिसून येते याचे गांभीर्य कोणत्याही निरीक्षकास दिसत नसल्याचे दिसून येते आतातरी पालिकेने सातारकरांवर उपकार म्हणून घंटागाड्या आणाव्यात अशी अपेक्षा सातारकर नागरिक करत आहेत
आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांना जवळपास वीस दिवस झाले आरोग्य विभागाची सूत्र हातात घेऊन त्यांनीच याकडे लक्ष देऊन मार्ग काढावा व संबंधित घंटागाड्या लवकरात लवकर चालू कराव्यात अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करत आहेत व घंटागाडी खरेदीत झालेले दर्शन लक्ष्मीचे याचाही पर्दाफाश सभापती घोरपडे यांनी करावा अशी मागणी काही लोकांनी सातारा नामाशी बोलताना केली आहे
क्रमश