गणेश उत्सव म्हटले की सर्वांमध्ये भक्तीचा माहिमा आणि चैतन्य निर्माण होते; परंतु या वर्षी करोनामुळे गणेशभक्तांचा हिरमोड झाला. त्याचबरोबर या 10 दिवसांच्या काळात अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न भागत असतो मात्र, यंदा करोनामुळे त्या रोजीरोटीवरही गंडांतर आले आहे. त्यामुळे “बाप्पा घालव रे तो करोना’ अशी आर्तहाक भाविक पोटतिडकीने बाप्पाला घालताना दिसत आहे.
गणेश उत्सवामध्ये आर्थिक गोष्टींची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. त्यामध्ये गणेशमूर्ती खरेदी, मंडप, लाइट, डेकोरेशन, देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम असतात. मात्र, यंदा केवळ मूर्ती खरेदी सोडून कसलीही अनुभुती घेता येणार नाही. दरम्यान, गणेशमूर्ती कारागीर आता मूर्तीला शेवटचा हात मारत आहे. तर यंदा जरा खर्च कमीच करू. असाच सूर प्रत्येक मंडळाकडून ऐकू येत आहे.
गणेश उत्सवात गणेशमूर्तीला मागणी असते. परंतु यंदा मोठे नुकसान होणार आहे. मंडळाच्या बुकिंग या दिवसात पूर्ण झालेल्या असतात; पण यंदा बुकिंग अत्यल्प आहे. मंडळाच्या मूर्ती दरवर्षी मोठ्या असतात त्यामुळे त्याची किंमतही जास्त मिळते. पण आता यावर पाणी फेरले असल्याने कारागीर आर्थिक संकटात सापडला आहे.
पपोट कुंभार गणेश मूर्तिकार, गडकर आळी सातारा