सातारा ते लातूर कामासाठी दहिवड़ी ते म्हसवड दरम्यान च्या 1118 वृक्षतोड़ बाबत माहिती देण्यास सातारा वनविभाग उदासीन: किरण खरात

43
Adv

दहिवड़ी वनक्षेत्रपाल यांचे अख्त्यारित येणाऱ्या 1118 झाडांची तोड़ करण्यात आली, या कामी म रा र विकास महामंडल पुणे यानी परवानगी मागितली होती आणि मेघा enginering प्राइवेट लिमिटेड यानी वृक्षतोड़ केली होती. वनविभाग दहिवड़ी यानी दिलेल्या परवानगी नुसार 2 वर्षात पर्यायी नवीन वृक्ष लागवड करणे बंधनकारक होते परंतु असे लागवड न करण्यात आलेने किरण खरात यानी वनक्षेत्रपाल दहिवड़ी यांचे कड़े माहिती मागवली होती,

त्यांनी नमूद माहिती न दिल्याने अपीलीय अधिकारी सहायक वनसंरक्षक सातारा यांचे कड़े दि.02 .11.2019 रोजीआपिल केले होते. त्या कामी माहिती देण्यासाठी त्यांनी 15.12 .19 रोजी तारीख नेमली होती तसे नोटीस ही सम्बन्धितना काढले होते.परंतु आज सातारा येथील त्यांचे कार्यालय रविवार साप्ताहिक सुट्टी असलेने बंद असलेचे सांगण्यात आले. मग सुट्टी दिवशी अधिकारी तारीख कशी नेमतात हा प्रश्न निर्माण झाला आहे.आणि मान तालुक्यातील संपूर्ण वृक्षतोड़ प्रक्रिया बाबत जाणीव पूर्वक माहिती न दिल्याचे किरण खरात यांनी सांगितले.

सुट्टीच्या दिवशी संबंधित तक्रार दार याला बोलून अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते वनविभागात काही काळेबेरे आहे का म्हणून अधिकारी संबंधिताला उत्तर देण्यास टाळात असल्याचे मत हे तक्रारदार खरात यांनी सातारानामा शी बोलताना सांगितले

Adv