देवेंद्र फडणवीस जयकुमार गोरे खा रणजीत निंबाळकर यांनी घेतली दिल्लीत गृहमंत्री अमित शहा व विविध नेत्यांची भेट

84
Adv

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शुक्रवारी भेट घेतली. महाराष्ट्रातील सध्याची कोरोना परिस्थिती आणि इतर विषयांवर दोन्ही नेत्यांची दीड तास चर्चा झली ‘यंदा महाराष्ट्रात ऊसाचे पीक वाढले असून शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत ही भेट घेतली असून गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली’, अशी माहिती फडणवीस यांनी भेटीनंतर पत्रकार परिषद घेत दिली.

“कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली. कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल’, असेही ते म्हणाले. दिल्लीत आमचे सरकार आहे. त्यामुळे राज्याला लागणाऱ्या मदतीसाठी आम्ही आलो आहे. काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादीत महाजॉब पोर्टलच्या श्रेयवादावरही त्यांनी टीका केली. जाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या, असा टोला त्यांनी लगावला.

सरकार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न आणि रस नाही, अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचे, असे उत्तर देत सरकार पाडण्याबद्दलच्या अफवांचे खंडन त्यांनी केले. राजस्थानमधील कथित ऑडीओ क्लिपबद्दल त्यांना विचारले असता देशात काय चालतं, राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे, असे म्हणत राजस्थानातील परिस्थितीत अशा घटना घडतातच असे ते म्हणाले.
भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी नियुक्ती झालेली नाही, असे स्पष्टीकरणी त्यांनी दिले. ही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली, असा पूर्नउच्चार करत हे सरकार अंतर्गत विरोधामुळेच पडेल, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला.

पंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष ठेवून आहे. कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल. तसेच कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांची भेट घेतली, सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्याकडे करणार आहेत.

फडणवीस यांच्यासोबत साताऱ्यातील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील कोल्हापूरचे धनंजय महाडिक आहेत. फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचीही भेट घेणार आहेत. भाजप नेत्यांची राज्यातील साखर उद्योगावर चर्चा होणार आहे. साखर कारखाने संकटात असल्याने मदत करावी, अशी मागणी नेते करणार आहेत.

Adv