उत्तर कोरेगाव तालुक्यात कोरोनाच्या शिरकावाने नागरिक भयभीत

83
Adv

पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी . उत्तर कोरेगाव तालुका मध्ये काही गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून काही काही गावे 14 दिवसांसाठी लाँकडाँऊन केली आहेत .
याबाबत सविस्तर वृत्त असे की उत्तर कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी, वाघोली, वाठार स्टेशन, घिगेवाडी ,पिंपोडे बुद्रुक आदि गावांपैकी काही गावां मध्ये कोरोना रुग्ण पाँझिटिव्ह सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही नागरिक हे पुणे- मुंबई येथून आलेले आहेत मात्र याबाबत स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती दक्षता समिती अथवा संबंधित प्रशासनाने दिली नसल्यामुळे कोरोना सारखा महाभयंकर रोगाने उत्तर कोरेगाव तालुक्यात शिरकाव केला आहे.
नुकत्याच लाँकडाऊन उठविल्याने सर्व दुकाने खुली झाली मात्र सोशल डिस्टन्सचा फैज्जाच उडाला आहे मग किराणा दुकान असो भाजी मंडई असो या ठिकाणी कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे कोरोना हा संसर्ग रोगाने उत्तर कोरेगाव तालुक्यात शिरकाव केल्याने नागरिका मधून भीतीचे वातावरण पसरले असून संबंधित महसूल खाते , पोलिस यंत्रणा याबाबत सतर्क झाले असून ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क वापर करा, सेनिटाँयझर वापर करा ,सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Adv