Wednesday, April 15, 2026
spot_img
Home Satara District वरूण राजा कुठे गेला रं ? जोमात असणार घेवडा पिंक पावसाअभावी कोमात...

वरूण राजा कुठे गेला रं ? जोमात असणार घेवडा पिंक पावसाअभावी कोमात जाण्याची वेळ !

283
Adv

जुलैमध्ये हमखास असणारा पाऊस गायब झाला आहे, हंगाम पुर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांनी वरुण घेवडा, वाटाणा आणि इतर पिकांची पेरणी केली आहे. मात्र पाऊस गायब झाला असून ऊन कडक पडू लागल्याने फुलकळीत व जोमात आलेली पिंक कोमजू लागली आहेत. पाऊस हुलकावणीत देत असल्याने ऐन भरात आलेले पिक वाया जाते की काय या भीतीने शेतकरी वर्ग आभाळाकडे डोळे लावून एका चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आस लावून बसला आहे… . कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात मध्यम पाऊसाच्या आधारावर १५ जूनच्या दरम्यान बहुतांशी पेरण्या उरकल्या, परिसरात घेवडा, वाटाणा, बटाटा व कडधान्य हे पीक घेतली जातात.जूनच्या शेवटच्या आठवड्यात तुरळक पाऊस झाल्याने पीक जोमात आली आहेत.शेतकऱ्यांनी वेळेत गवत कोळपणी आणि खुरपणी केली आहे.सोबत पीक चांगली यावीत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी तणनाशक व किटकनाशका बरोबर टॉनिक मारले आहे. बागायती पीक सोडली तर इतर जिरायती शेतकरी औषधांच्या भानगडीत पडला नव्हता,मात्र कधी नव्हतं यावेळी कृषीसेवा व खतांच्या दुकानांत शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती.जवळपास संपूर्ण सध्याचे पीक पावसावर अवलंबून आहे.सध्या घेवडा पिक जोमात आलें आहे,फुलकळीचा चांगला भर आला आहे.मात्र कडक उन्हात पान माना टाकू लागली आहेत.अजून दोन तीन दिवस अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.या पिकांना एका पावसाची अत्यंत गरज आहे. मात्र जुलै महिना संपत आला तरी म्हणावा असा पाऊस पडला नाही,गेल्या पाच सहा दिवस झाले वातावरणात प्रचंड उखाडा व कडक उन्ह पडतं आहे.त्यामुळे पाऊस नाही पडला तर पिक धोक्यात येऊ शकतात या काळजीने शेतक-यांच्या तोडी एकच शब्द येतो की अरे वरूण राजा कुठे गेला तु रं ? अशी आर्त भावना व्यक्त केली जात आहे.एकंदर घेवडा पिकाला एका चांगल्या पावसाची गरज आहे.

Adv