महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्हा वाहतूक पोलीसांची अव्वल कामगीरी

108
Adv

कोवीड १९ च्या अनुषंगाने शासन आदेशानुसार लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता मा.तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक सो सातारा यांनीदिलेल्या आदेशाप्रमाणे सातारा जिल्ह्यात माहे जुलै २०२० या महिन्यामध्ये मा.अपर पोलीस अधीक्षक सोो, श्री.धीरज पाटील, मा.सहा.पोलीस अधीक्षक सो समीर शेख उप विभागीय पोलीस अधिकारी सातारा,पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा सातारा मा.संदिप भागवत यांचे मार्गदर्शना नुसार वाहतूक विशेष मोहिमेचे नियोजन करुन लॉकडाऊनच्या नियम मोडणारे बेशीस्त वाहन चालकांवर इ-चलन मशीनव्दारे मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

सदर मोहिमेमध्ये एकुण ४८७६२ कारवाई करण्यात आली. सातारा जिल्हा वाहतूक पोलीसांनी केलेली नमुद कारवाई ही महाराष्ट्र राज्यात सरासरी नुसार प्रथम क्रमांकाने अव्वल ठरली आहे. सहा.पोलीस निरीक्षक व्ही.ए.शेलार व वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर कर्मचारी यांचे मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.लॉकडाऊनचे नियंमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता व सुरक्षीत वाहतूकी करीता यापुढे देखील लॉकडाऊनचे व वाहतूक नियमांचे उल्लंघण करणारे
वाहन चालकांचे विरोधात विशेष मोहिम राबवून आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी नियमांचे काटेकोरपणे पालण करणेचे आवाहन वाहतूक शाखेचे
सहा.पो.निरीक्षक, व्ही.ए.शेलार यांनी केले आहे.

Adv