महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मुंबई, पुणे यांसारख्या शहारानंतर आता सातारा, सांगली येथेही करोनाचे रुग्ण सापडले आहेत. यावरून भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी आवाहन करत लोकांनी घाबरुन जाऊ नये असं म्हटले आहे. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे असं सांगताना श्री छ उदयनराजे यांनी प्रशासनाला पूर्णपणे मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
आपण सर्वांनी भारत सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो. काहीही झाले तरी आपण आपल्या घराच्या बाहेर पडू नका. घरातील सदस्याला ताप, डोके दुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणे इत्यादी त्रास होत असेल तर आपल्या नजीकच्या डॉक्टरशी संपर्क साधा”.
खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सातारा, सांगली येथे कोरोना रुग्ण सापडले असले तरी लोकांनी घाबरून, गडबडून जाऊ नये. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे. आपले प्रशासन निपटारा करण्यासाठी मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे”.