येथील काँग्रेस भवनात कार्यकर्ता मेळावा आणि नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या सत्कार कार्यक्रम करण्यात आला यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे सांगली येथील जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कार्याध्यक्ष अॅड. विजयराव कणसे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, हिंदुराव पाटील, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आत्तापासूनच बांधणी करणे आवश्यक आहे. युवक काँगे्रसच्यावतीने जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याची तयारी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, त्या ३० गटांचा रोड मॅप तयार केला असल्याची माहिती युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी यावेळी दिली
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दिल्ली जळत असताना पंतप्रधान मोदी ट्रम्पच्या स्वागतासाठी अहमदाबाद येथे गेले होते. कायदा सुव्यवस्था ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना यात अमित शहा अपयशी ठरले आहेत. ही जोडगोळी पोलिसांना काम करू देत नाही. त्यामुळे नाहक 42 जणांचा बळी गेला आहे. गुजरातमध्ये 2002 मध्ये घडले त्याचप्रकारे दिल्लीत दंगली घडवण्याचा या जोडगोळीला डाव आहे. पुढे आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सुरेश जाधव यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. पद दिले म्हणजे जादूची कांडी नसते. त्याच्यामागे पाठबळ लागते. पक्ष बळकट करण्याचा विडा उचलला आहे. लवकर कार्यकारणी तयार करून पक्षविस्ताराबाबत ठोस कार्यवाही केली जाईल.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभाग घेतला. महाविकास आघाडीत काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होणे हे भाग्यच आहे. राज्यातील प्रश्नांवर आंदोलने करावी लागणार नाहीत. पण काँग्रेस बळकट करावी लागणार आहे. डॉ. सुरेश जाधव म्हणाले, आपण सर्वजन जिल्हाध्यक्ष असल्याप्रमाणे वाटचाल करूया. काँग्रेसला मरगळ आली होती म्हणतात पण ही मरगळ नसून चांगल्या स्थितीत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला विचारल्याशिवाय कोणालाही काही करता आले नाही पाहिजे.
अॅड. विजयराव कणसे, विराज शिंदे, धनश्री महाडिक, प्रताप देशमुख , मनोजकुमार तपासे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबुराव शिंदे यांनी प्रस्ताविक केले तर नरेश देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रताप देशमुख, झाकीर पठाण, अविनाश फाळके, निवास थोरात, अजित पाटील चिखलीकर, अन्वर पाशा खान, रोहिणी निंबाळकर, राजिया शेख, प्रल्हाद कदम, दयानंद भोसले, साहेबराव जाधव, विजयाताई बागल, बाळासाहेब बागवान, किरण बर्गे आदी उपस्थित होते