साताऱ्यात होणारा नक्षत्र महोत्सव स्थगित श्री . छ दमयंतीराजे भोसले

114
Adv

सातारकरांच्या हृदयात अढळं स्थान मिळवणारा नक्षत्र महोत्सव दि 10 ते 14 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला होता . मात्र कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे हा महोत्सव स्थगित करण्यात आल्याची माहिती नक्षत्र च्या संस्थापिका व अध्यक्ष श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले यांनी दिली .

नक्षत्र च्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकात नमूद आहे की, नक्षत्र महोत्सव व सातारकर यांच्यात पंधरा वर्षाचे अतूट नाते आहे . सातारा शहरातील बचत गटाच्या उत्पादनांना वेगळी ओळख व बाजारपेठ मिळावी या हेतूने नक्षत्र महोत्सवाचे आयोजन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने केले जाते . सुरवातीला नक्षत्र महोत्सव राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये भरविला जात होता . मात्र नक्षत्र ला सातारकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला . लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमांनी सुद्धा नक्षत्र महोत्सवाला नेहमीच सक्रीय पाठिंबा दिला . मात्र यंदाच्या वर्षी १० ते १४ एप्रिल दरम्यान होणारा नक्षत्र महोत्सव कोरोना संसर्गाच्या कारणामुळे स्थगित करण्यात आला आहे .

जानेवारी 2021 मध्ये भव्य स्वरूपात नक्षत्र चे आयोजन करण्यात येईल व त्याची तारीख व वेळ सोयीस्कररित्या कळविली जाईल अशी माहिती नक्षत्र च्या अध्यक्षा श्री छ सौ.दमयंतीराजे भोसले यांनी दिली .

Adv