आरोग्य सभापती अनिता घोरपडे याच्या पाय गुणाने पालिकेला odf प्लस मानांकन

85
Adv

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जिल्ह्यातील सर्वच पालिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हे अभियान वर्षभर चालत असले तरी ४ ते ३१ जानेवारी हा स्पर्धेचा कालावधी होता. २८ दिवस चाललेल्या या अभियानात सातारासह सर्वच पालिकांनी स्वच्छतेभर भर देत स्पर्धेच्या निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला.
‘ओडीएफ प्लस प्लस’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सातारा पालिकेकडून यंदा ‘बेस्ट टॉयलेट’ ही संकल्पना राबविली गेली. याअंतर्गत शहरातील ७१ पैकी १८ सार्वजनिक स्वच्छतागृहांचे नुतनीकरण करण्यात आले. या ठिकाणी वीज, चोवीस तास पाणी, महिलांसाठी वेंडिग व डिस्पोजल मशिन, वॉश बेसीन, आरसा, कमोड, पेपर नॅपकिन, एक्झॉस्ट् फॅन, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प, सुरक्षारक्षक आदी सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. केंद्रीय समितीने अचानक भेट देऊन या कामांची पाहणी केली होती.

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सात पालिकांना शासनाचे ‘ओडीएफ प्लस प्लस’ मानांकन जाहीर झाले आहे. स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्ती, नूतनीकरण, नागरिकांना पुरविल्या जाणाºया सेवा सुविधा व हगनदारीमुक्तीसाठी केलेले प्रयत्न आदी निकषांची पूर्तता केल्याने शासनाकडून हे प्रमाणपत्र जाहीर झाले आहे.

सर्व निकष पूर्ण केल्याने महाराष्ट्रातील ११३ तर सातारा जिल्ह्यातील सात पालिकांना ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन जाहीर झाले आहे. यामध्ये सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कºहाड, मलकापूर व रहिमतपूर नगरपालिकेचा समावेश आहे. सातारा पालिकेला यापूर्वी ओडीएफ प्लस हे मानांकन प्राप्त झाले आहे. या पालिकांनी हगनदारीमुक्त शहराकडे वाटचाल सुरू केली असून, या यशात प्रशासनासह लोकसहभाग महत्त्वाचा ठरला आहे.

Adv