मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोना या साथीच्या रोगाचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करीत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
–
सध्या या रोगाच्या दुसऱ्या टप्यातील संक्रमण अवस्थेत आपण आहोत. तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल, विशेषत: चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे सांगितले.
–
पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला आहे.महाराष्ट्र शासनाने देखील वेळीच पावले उचलून कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी प्रयत्न केले आहेत, रूग्णांची संख्या कमी असली तरी रोगाच्या फैलावाचे स्वरूप पाहता भ्रमात राहण्यात अर्थ नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
–
२२ मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमाने बंद करण्यात येणार आहेत. तोपर्यंत २०-२५ हजार प्रवासी देशात-राज्यात परततील. या प्रवाशांचे क्वारंटाईन करावे लागेल किंवा त्यांच्यावर उपचार करावे लागतील. यावर उपाय शोधण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
–
आजच्या घडीला सर्व वैद्यकीय सुविधा राज्यात उपलब्ध आहेत परंतु पुढील काळात क्वारंटाईन साठी अधिक सुविधा लागतील. औषधे, व्हेंटिलेटर्स तसेच उपचारांसाठी रूग्णालयांची गरज भासेल. यासाठी लष्करी रूग्णालयांची प्रसंगी मदत घ्यावी लागेल, याविषयी उपाययोजना करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
Home Maharashtra मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद