चोरे विभागाचे पाण्याचे स्वप्न सत्यात आणणार – मनोजदादा

160
Adv

चोरे विभागातील इंच न इंच क्षेत्र पाण्याखाली आणण्याचे स्वप्न लोकनेते बाबासाहेब चोरेकरांनी पाहीले होते. पंरतु इथल्या विद्यमान आमदारांना ते जमले नाही. मग कशासाठी त्यांना मते द्यायची. जाणिव पुर्वक चोरेकरांचा भाग त्यांनी विकासा पासून वंचित ठेवला. पंरतु आता वेळ बदलली आहे. उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागाच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला आहे. भाजप महायुतीच आपल्या भागाला पाणी देवून दुष्काळ मुक्त करणार असे आश्वासन भाजप महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांनी दिले.
चोरे ता. कराड येथे मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी झालेल्या कोपरा सभेत चोरे विभागाच्या पाणी प्रश्नावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशतात्या पाटील, भैय्यासाहेब साळुंखे, निखील साळुंखे पाटील, धैर्यशील साळुंखे पाटील, संजय गोळे, संजय साळुंखे, भांबे संदीप काटे, महेश काटे, शरद भोसले, अक्षय यादव, मुकुंद गोळे, जालिंदर रामुगडे, विजय चव्हाण, अगंद साळुंखे, विकास साळुंखे, दिपक साळुंखे, बबन यादव, राजेंद्र साळुंखे, नरेंद्र यादव, नारायण कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, दिगंबर भिसे पाटील, वडगावचे माजी सरपंच रणजित कदम, जयवंत जाधव,
मनोजदादा म्हणाले, चोरे विभाग पाण्यापासून तहानलेला आहे. पाणी संघर्ष समितीचे आम्ही पाठीशी आहोत. आपला प्रस्ताव मंत्रालयात आहे. परवाच शुभारंभाचा नारळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाल येथे फोडला त्यावेळी त्यांनी 50 मीटरचे हेड 100 पर्यंत हेड पर्यंत नेण्याचा शब्द दिला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द म्हणजे शिरोधारी असून दोन कॅबिनेटच्या बैठकीतच हा प्रश्न मार्गी लावू इतर विकासांनाही महायुती कधीही कमी पडणार नाही. गेल्या 25 वर्षाचा विकासाचा अनुशेष आपण भरून काढू तसेच एम टॅंक क्षेत्रातील जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. या परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटला तर या परिसराचे नंदनवन होणार आहे. त्यामुळे पंचवीस वर्षात ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना आणखीन दहा दिली तरी काहीच फरक पडणार नाही. सध्या लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. बदलाच्या प्रवाहात सर्वांना बरोबर घ्या असे आवाहन मनोज दादा घोरपडे यांनी केले. महायुतीच्या दिशेने आपण गेलो तर पाणी आहे तर महाविकास आघाडीच्या दिशेने गेलो तर आपल्या माथी पुन्हा दुष्काळ असल्याचे ते म्हणाले.
भैय्यासाहेब साळुंखे म्हणाले, मनोजदादा घोरपडे हे गतिमान क्रियाशील नेतृत्व आहे. कराड उत्तरचा आश्वासक चेहरा म्हणून या नेतृत्वाला पसंती मिळत आहे. चोरे विभागातून मनोज दादांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य येथील जनता देणार आहे. संजय साळुंखे म्हणाले, मनोजदादा घोरपडे यांनी गेल्या बारा वर्षांपासून चोरी विभागाशी संपर्क ठेवला आहे. लोकांचे विविध प्रश्न सोडवले असून महिलांचे संघटन उभे केले आहे. यावेळी सर्व जनता मनोज दादा घोरपडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मनोजदादाच कराड उत्तरचे आमदार होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान गावभेट दौऱ्यानिमित खोडद, हरपळवाडी, भगतवाडी, मरळी, डफळवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, साखरवाडी, जंगलवाडी, धावरवाडी, सावरघर या गावांमध्ये मनोजदादांना घोरपडे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी ग्रामस्थ स्वागतासाठी उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

चौकट : प्रचारादरम्यान मनोजदादा घोरपडे यांनी लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. तसेच चोरेकर कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देवून चर्चा केली. पाल जिल्हा परिषद गट, चोरे विभाग विकासाचे रोल माॅडेल करु असे मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब चोरेकर यांनी मनोजदादांना शुभेच्छा देवून जनता तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

चौकट….
सावरघर मध्ये मनोजदादांचे अनोखे स्वागत –
– झाडांचे गाव अशी ओळख असणाऱ्या सावरघर ता.कराड येथील ग्रामस्थांनी भाजप महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावच्या प्रवेशद्वारावर रांगोळीत कमळ चिन्ह रेखाटून तसेच संपुर्ण गावात रांगोळी चा सडा टाकण्यात आला. ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी औक्षण केले. यावेळी सरपंच अंकुश सप्रे, रामदास बाबर, जगन्नाथ पाटील, रामचंद्र पाटील, प्रशांत सप्रे, तसेच सुरेशतात्या पाटील, संदीप काटे, रणजित कदम, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

मरळी
जिल्हा उपाध्यक्ष सुरेशतात्या पाटील, कराड उत्तर अध्यक्ष, शंकरराव शेजवळ, सुर्यकांत पडवळ, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष राज सोनवणे, विश्वास काळभोर, राहुल पाटील, लाला साहेब गिरीगोसावी, अमोल थोरात, प्रांजल जाधव,
पालचे सरपंच धनंजय घाडगे, ओंकार पाटील, निलेश शिरसट,

चौकट – मरळी येथे बोलताना सुर्यकांत पडवळ यांनी मनोजदादा घोरपडे यांना प्रचंड मताधिक्य मिळणार आहे. या विभागात नाकर्त्या आमदारांमुळे पाणी, रस्ते यासह मुलभूत सुविधा मिळाल्या नाहीत.आमच्या प्रश्नांसाठी विधीमंडळात कधीही आवाज उठवला नाही.महायुती सरकारने विविध योजना आणल्या. मनोजदादांना निवडून द्यायचेच आहे. ज्या आमदारांनी मरळी चोरे परिसर विकासपासून वंचित ठेवण्याचे काम केले त्या का निवडून द्यायचे असा सवाल उपस्थित केला. मनोजदादांना मत म्हणजे विकासाला मत असल्याचे त्यांनी सांगितले.

Adv