सातारा पालिकेच्या बोगस ओळखपत्राचा कारभार चव्हाट्यावर आला असून मुख्याधिकारी शंकर गोरे याकडे लक्ष देणार का हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे याप्रकरणी महिला पोलीस हवालदार वैशाली गुरव यांनी फिर्याद दिली आहे.
अत्यावशक सेवेत नसतानाही सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र घेऊन सातारा शहरातून विनाकारण फिरणार्या वरद नंदकुमार चक्के, अमेय दिलीप जगताप राहणार सोमवार पेठ सातारा यांच्यावर जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
पोलीस हवालदार वैशाली गुरव या इतर सहकार्यांसह राधिका रोड परिसरात गस्त घालत होत्या. त्यावेळी संशयित दोघे दुचाकी क्रं mh 11 सीपी 5433 वरुन निघाले होते. त्यांना पोलीस हवालदार वैशाली गुरव यांनी थांबवून बाहेर येण्याचे कारण विचारले असता वरद याने सातारा नगरपालिकेच्या शीघ्र प्रतिसाद पथकातील भालचंद्र डोंबे यांचे ओळखपत्र दाखवून पेट्रोल भरण्यासाठी निघाल्याचे सांगितले.
पोलिसांना या दोघांचाही संशय आल्याने त्याच्याकडे आधार कार्डची मागणी केली आधार कार्ड दाखवण्यास नकार दिला. संशयित दोघांनी सातारा पालिका कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या दोघांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सातारा पालिकेने किती बोगस कार्ड चे वाटप केले हे खरे शोधण्याचे धाडस मुख्याधिकारी शंकर गोरे दाखवणार का हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे