आयुर संस्थेमार्फत सातारा पोलिसांना करण्यात आले सँनि टायझर चे वाटप

93
Adv

कोरोणा च्या पार्श्वभूमीवर आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या पोलिसांना आयुर संस्थेमार्फत सँनि टायझर चे वाटप करण्यात आले यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे , व शाहुपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल वायकर तसेच संस्थेचे संचालक माजी नगरसेवक संजय शिंदे सचिन सावंत व प्रमोद चव्हाण उपस्थित होते

पूर्ण जगावर कोरोना हे संकट आले असून लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहिलेले दिसून येतात सामाजिक बांधिलकी म्हणून आयुर संस्थेमार्फत सातारा शहर पोलीस स्टेशन शाहूपुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा येथे जवळपास तीनशे बॉटल चे वाटप या संस्थेमार्फत करण्यात आले

आयुर संस्थेमार्फत अजून विविध ठिकाणी सँनि टायझर चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक व माजी नगरसेवक संजय शिंदे सचिन सावंत व प्रमोद चव्हाण यांनी यावेळी दिली

Adv