प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक मनोज शेंडे यांनी गोरगरीब व गरजू कुटुंबांना केले स्वखर्चातून 150 किराणा किटचे वाटप
कोरोंनाचे भीषण संकट देशावर आलेले असताना या लॉकडाउनच्या काळात हातावरील पोट असलेल्या आपल्या गरजू बांधवांना मदत करणे आपली सामाजिक जबाबदारी आहे. हीच जबाबदारी सामाजिक बांधिलकी जपत प्रभाग क्रमांक दहा चे नगरसेवक मनोज शेंडे यांनी स्वखर्चाने जवळपास दीडशे कुटुंबांना एक महिना पुरेल इतके किराणा किट चे वाटप केले
नगरसेवक मनोज शेंडे प्रभागात विविध उपाययोजना राबविण्यासाठी खूप धडपड करत असतात
प्रभागातील प्रत्येक जबाबदारी नगरसेवक शेंडे यांनी घेतली आहे. जिथे जिथे गरज लागेल, जे जे करणे आवश्यक आहे ते ते करत राहणार अशी ग्वाही नगरसेवक मनोज शेंडे यांनी यावेळी दिली. या उपक्रमासाठी लाखो शुभेच्छा पाठीशी आहेत, त्या पुरेशा आहेत त्यामुळे कोणाकडूनही देणगी, मदत घेतली जाणार नाही, असे ही नगरसेवक शेंडे यांनी स्पष्ट केले आहे.