सातारचे आरोग्य निरीक्षक क्वारंटाईन असताना उगवले पालिकेत

111
Adv

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरातच रहा असे जिल्हा प्रशासन ओरडून सांगत असताना पालिकेचे दुबई वारीमुळे क्वारंटाईन झालेले आरोग्य निरीक्षक बुधवारी पालिकेत येउन बसल्याने एकच गोंधळ उडाला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मात्र या प्रकरणी कानावर हात ठेवले असून माहिती घेऊन संबधितांना नोटीस बजावण्याची गडबड करत सातारा पालिका प्रशासनाने सारवासारव केली .सातारा शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य विभागाचे डोके नक्की ठिकाणावर आहे काय ? हेच तपासण्याची वेळ आली आहे

जगभरात करोनाची महामारी ऐन भरात असताना सातारा पालिकेच्या आरोग्य विभागातील एका आरोग्य निरीक्षकाने परदेश दौरा केल्याची माहिती समोर आली मात्र मुळातच व्यवस्थेत लागेबांधे मजबूत असल्याने परदेशवारीच हे प्रकरण समोर आलेच नाही . आरोग्य यंत्रणेने संबधित आरोग्य निरीक्षकांना दोन वेळा क्वारंटाईन केल्याची माहिती आहे . असे असताना बुधवारी काहीतरी कामाचे निमित्त काढून हे महाशय सातारा पालिकेच्या आरोग्य विभागासह इतर दोन तीन कक्षात येऊन गेल्याचे वृत्त आहे . क्वारंटाईन पिरियड चा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी यापूर्वीच दिले आहेत

त्या पाश्र्वभूमीवर आरोग्य निरीक्षकांच्या बेजवाबदार वर्तनाचा कारनामा समोर आल्याने एकच खळबळ उडाली .आरोग्य निरीक्षकांचा क्वारंटाईन पिरियड बारा एप्रिलपर्यंत लागू होता मात्र तत्पूर्वीच त्यांना कामाची प्रचंड घाई झाल्याने ते करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना धाब्यावर बसवून थेट पालिकेत अवतरले त्यामुळे पालिकेच्या यंत्रणातील त्रुटींवर प्रकरणाच्या निमित्ताने बोट ठेवले गेले आहे .आरोग्य निरीक्षकांना वरिष्ठांकडून विचारणा झाली तरी आपण केले ते योग्यच अशा अभिरभावात येत थाटात उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून गेले .आरोग्य यंत्रणा व पदाधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणावर मूगं गिळून गप्प बसण्याचा सावध पवित्रा घेतला . या प्रकरणाची कुणकूण प्रसारमाध्यमांना लागताच फोनाफोनी व माहिती घेण्याचे सत्र सुरू झाले तेव्हा संबधितांना नोटीस काढल्याची सारवासारव आरोग्य विभागाला करावी लागली .

परदेश दौऱ्यानांतर सेल्फ डिक्ल रेशन न करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांच्या या एकूणच प्रकरणावर आधीच कठोर कारवाई होणे अपेक्षित होते . जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या पत्रकार परिषदेतही आरोग्य निरीक्षकांच्या वादग्रस्त परदेश दौऱ्याची तक्रार झाली होती आरोग्य निरीक्षक हे मुख्याधिकाऱ्यांच्या विशेष मर्जीतील असल्याची चर्चा असल्याने आरोग्य पूर्ण संबंध अडचणीत येणार नाहीत याची नेहमीच काळजी घेतली जाते . क्वारंटाईन चा नियम मोडून बेजवाबदार वर्तन करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांवर पालिका किंवा त्यानंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

Adv