पालिकेच्या विविध अधिकारी इतरांशी वारंवार संपर्क साधून सुद्धा कोणीही दाद न दिल्याने स्वखर्चाने दोनशे कुटुंबांना नगरसेवक निशांत पाटील यांनी धान्य दिले यावरून एकच कळते की खुद्द सातारा विकास आघाडीच्या माझी नगराध्यक्षांना सत्तेत असून दाद मिळत नसल्याचे दिसून येते
ज्या कुटुंबांना रेशन कार्ड नाही अशांना सातारा पालिकेतर्फे आधार कार्ड दाखवून अन्नधान्य देण्याचा उपक्रम केला होता मात्र सातारा पालिकेतील अधिकारी व इतर वर्गाने साथ न दिल्याने माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक निशांत पाटील यांनी स्वखर्चाने जवळपास दोनशे कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका अन्नधान्य साठा दिला
कोरोना मुळे बऱ्याच लोकांचे हाल झाले बरेच परप्रांतीय व मजूर हे सदर बाजार लक्ष्मी टेकडी परिसरात आहेत अशा लोकांवर उपासमारीची वेळ आली होती पालिकेची मदत मिळत नसल्याने हतबल झालेले सातारा विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक निशांत पाटील यांनी जवळपास दोनशे कुटुंबांना स्वखर्चाने दोन लाख रुपये खर्च करून अन्नधान्य व इतर मदत केली खुद्द आघाडीच्या माजी नगराध्यक्ष यांच्यावर ही वेळ असेल तर इतर नगरसेवकांचे काय हाल झाले असतील हे देव जाणे अशा परिस्थितीतही काही लोकांनी राजकारणच केले असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक निशांत पाटील यांनी सातारानामाशी बोलताना केला आहे