सातारा शहरात करोनाशी दोन हात करण्यात पालिका प्रशासनाने तगडे प्रयत्न सुरू ठेवले आहेत . एकीकडे निर्जंतुकीकरण तर दुसरीकडे डोअर टू डोअर सर्वे अशी दुहेरी कसरत पालिकेच्या आरोग्य विभागाची सुरू आहे
. या कसरतीचे उत्तम नियोजन उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी सुरू ठेवल्याने धन्यवाद धुमाळ साहेब हे शब्द आपसूकपणे बाहेर पडत आहेत .
घंटागाड्यांचे पासिंग, त्याचा रूटमार्च अंतिम करणे, सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधांचे वाटप करणे, सर्वे पथकांना त्यांच्या जवाबदाऱ्या निश्चित करून देणे इ कामांच्या निमित्ताने संचित धुमाळ यांची चौदा ते पंधरा तास आरोग्य विभागाच्या कामांची रंगीत तालीम सुरू आहे .करोनाच्या अटीतटीच्या लढाईत आरोग्य विभाग प्रचंड शिस्तीत आपल्या दैनंदिन कामासाठी सिध्द आहे . सर्वे पथकाचे कर्मचारी, घंटागाडयांचा रूट त्याची पाहणी याचा उत्तम समन्वय राखण्यात आल्याने नेहमीच वादावादीच्या रडारवर असलेला आरोग्य विभाग सध्या कौतुकाचा विषय बनला आहे
मुळात उपमुख्याधिकारी हे पद तसे वसुली विभागाचे प्रमुख असतात . मात्र वर्षभरापूर्वी पालिकेत हजर झालेल्या धुमाळांना मुख्याधिकाऱ्यांच्या आग्रहाने आरोग्य विभागाची जवाबदारी देण्यात आली . कामाच्या खोलात शिरून मायक्रो प्लॅनिंग व अंमलबजावणी करण्याचा धुमाळांचा खाक्या आहे .आरोग्य पूर्ण वजन ठेवणारे अधिकारी व पदाधिकारी यांचे खाचखळगे सुध्दा त्यांनी पटकन समजावून घेतले .
सध्या करोनाच्या निमित्ताने साताऱ्यात घरोघरी सर्वे सुरू आहे . आरोग्य विभागाच्या सूक्ष्म नियोजनामुळे पहिल्या च दिवशी आरोग्य विभागाने सहा हजार कुटुंबाचा सर्वे केला . मात्र दोन करोना पेशंट पॉझिटिव्ह दाखल झाल्याने वॉर्ड क्रमांक १ ते ५ मध्ये प्रत्येक कुटुंबाची तपशीलवार माहिती घेण्याचे काम अत्यंत बारकाईने सुरु करण्यात आले आहे . धुमाळ साहेबांच्या या स्केल वर्कचा प्रशासनाला सुध्दा चांगलाच फायदा होत आहे .
त्यामुळे सातारकर वेल डन धुमाळ साहेब असे कौतुकाने म्हणत आहेत