पं स अभियंता गाढवे साहेब यांच्या आशीर्वादाने सुरु आहे शाहूपुरीत अनाधिकृत अंगणवाडी चे काम ग्रामपंचायतीचा आरोप

97
Adv

गंगासागर कॉलनी येथे अनाधिकृतपणे अंगणवाडी चे काम चालू असल्याचे शाहुपुरी चे सरपंच गराडे यांनी सांगितले हे सर्व पंचायत समितीचे अभियंता गाढवे साहेब यांच्या आशीर्वादाने चालली असल्याची माहितीही शाहूपुरी ग्रामपंचायतीने दिली

पंचायत समिती मार्फत शाहूपुरी येथील ओपन स्पेस असलेल्या 409 या जागेत अंगणवाडी मंजूर झाली होती तिथे न बांधता काही अंतरावरच ओढ्याच्या लगत अंगणवाडी बांधण्यात आली असून एका सामाजिक कार्यकर्त्यांने याबाबत शाहूपुरी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली त्या तक्रारीनुसार शाहूपुरी ग्रामपंचायतीने पाहणी केली असता सदरचे काम थांबविण्याची मागणी पंचायत समितीचे bdo खैरमोडे यांच्याकडे केली त्यानुसार हे काम थांबले आहे तत्पूर्वी याचे चार लक्ष रुपये बिल गाढवे साहेब यांनी कसे आदा केले असा प्रश्नही शाहूपुरी ग्रामपंचायतीला पडला आहे

दरम्यान ही अंगणवाडी अधिकृत असल्याचा दावाही अभियंता गाढवे साहेब यांनी सातारा नामाशी बोलताना केला आहे

दरम्यान याप्रकरणी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य अधिकारी फडतरे साहेब यांच्याशी सातारानामा ने संपर्क साधला असता बीडिओ खैरमोडे साहेब यांना संबंधित अंगणवाडीची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते

Adv