.छ शिवेंद्रसिंहराजे यांनी हायवेच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करावी ॲड द्रविड

62
Adv

विषय :
मा. महोदय,
आम्ही दि. ०२/११/२०१९ दिनांकदर्शी चे नॅशनल हायवे ओथोरिटी ऑफ इंडिया ला प्रेषित केलेली नोटीस माहिती आणि योग्य कारवाईकरिता आपणाकडे पाठविली होती, मात्र संबंधित पत्र पोहोचूनही त्यावर आपली कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

आपण मिडिया आणि जनतेला विश्वासात घेऊन असे सांगितले होते की, नोव्हेंबर अखेर जर महामार्गावरील दुरावस्था संबंधित अधिकाऱ्यांनी दूर केली नाही, तर जनआंदोलनाच्या सहाय्याने टोल बंद केला जाईल. मात्र, डिसेंबर मधील दोन आठवडे उलटूनही आपण त्यावर कोणतीच भूमिका घेतलेली नाही. साताऱ्यातील अग्रगण्य दैनिकांनी देखील आपणाला या विषयी विचारले असता, आपण या बाबत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे.
आपणासारख्या लोकप्रिय आणि समाजहित जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाकडून सामान्य जनतेची वेगळी अपेक्षा असून आपली याबाबत नक्की कोणती भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुतचे पत्र आपणाला प्रेषित केले आहे. आम्ही सबंधित कंपनीवर जनहितार्थ मा. ना. उच्च न्यायालय सो., मुंबई येथे ‘ जनहित याचिका ‘ दाखल करणार असून याबाबत आपले सहकार्य आम्हास अपेक्षित आहे.

आपल्या भुमिकेबद्दल कोणताही संभ्रम कोणाच्याही मनामध्ये येऊ नये या शुद्ध हेतूनेच आपल्याला प्रस्तुतचे पत्र प्रेषण केले आहे.

Adv