पंचायत समितीचे अभियंता गाढवे साहेब यांच्या संगनमताने शाहूपुरी येथे बांधण्यात आलेली अंगणवाडी याचा अहवाल उपमुख्य अधिकारी जिल्हा परिषद ससे साहेब यांनी मागवला आहे
दोन दिवसापूर्वी सातारानामाने शाहुपुरी येथील अनाधिकृत अंगणवाडी चे वृत्त प्रसारित केले होते याची दखल जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी ससे साहेब यांनी घेतली असून सातारा पंचायत समितीचे खैरमोडे साहेब यांच्याकडून अहवाल मागवला आहे यामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन ही उपमुख्य अधिकारी ससे साहेब यांनी सातारा नामाशी बोलताना सांगितले
शाहूपुरी ग्रामपंचायतीचा असा आरोप आहे की अभियंता गाढवे साहेब यांच्या संगनमतानेच हे सर्व घडले असून आपल्या अंगाशी काही येऊ नये म्हणून त्यांनी चार लक्ष रुपयाचे बिल ही संबंधित ठेकेदारास आदा केल्याने नक्कीच या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असा संशय शाहूपुरी ग्रामपंचायतीला आल्याने संबंधित काम थांबवले असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे मंगळवार पर्यंत अहवाल येईल असे खैरमोडे साहेब यांनी सांगितले आहे मात्र अभियंता गाढवे यांच्या लीला थांबताना दिसत नसल्याचे चित्र आज पंचायत समितीमध्ये दिसून आले अभियंता गाढवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलले नाहीत
क्रमश