वाठार स्टेशन परिसरात घडलेल्या चोरींच्या गुन्हयाचा तपास लावण्यात वाठार स्टेशन पोलिसांना यश. 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस*

83
Adv

वाठार पोलिस स्टेशनच्या हद्दीत 3 महिन्यापासून वाठार, तळीये, बिचुकले,अरबवाडी, या गावांच्या हद्दीमध्ये घडलेल्या घरफोडीचे गुन्हे वाठार पोलिस स्टेशनला दाखल असून सदर चोरीच्या गुन्हाचा तपास करत असताना घरफोडी करणारी टोळी वाठार स्टेशन पोलिसांकडून जेरबंद करण्यात यश आले.

सदर जेरबंद केलेले आरोपी 1) प्रदीप प्रकाश माने वय,26 रा. वाठार स्टेशन, ता.कोरेगाव.जि.सातारा.2) विजय बाळू जाधव वय.19 रा. भाडळे ता. कोरेगाव. 3) अक्षय बाजीराव दोरके वय.20 रा. वाठार स्टेशन. ता. कोरेगाव.4) इर्शाद हारून मुल्ला, वय 36 रा. वाठार स्टेशन. ता. कोरेगांव.5) तसेच 1 बालअपचारी आरोपीस अटक करून त्यांचेकडून चोरून नेलेला मुद्देमाल जप्त केला. आरोपीने घरफोडी केलेल्या 6 गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचेकडून एल ई डी,टीव्ही, वजन काटा, दीड तोळ्यांची सोन्याची लगड, स्प्लेडर मोटर सायकल, इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.तसेच आरोपी कडून आणखी काही मुद्देमाल हस्तगत करणेचे काम चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.धीरज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस स्टेशनचे सपोनी,श्री.स्वप्नील घोंगडे साहेब,पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, स.पो.फौ गुजर,यादव,पो.हवा.नितीन भोसले, चोरट, तानाजी चव्हाण,सचिन जगताप, गहिन, नितीन पवार, खरात,तुषार आडके,तसेच इतर पोलीस कर्मचारी सदर कारवाईत उपस्थित होते.

तसेच वाठार स्टेशन परिसरात आणखी काही घरफोडी, आणि चोरीचे प्रकार घडले असल्यास नागरिकांनी वाठार पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले. सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.स्वप्नील घोंगडे साहेब करीत आहेत.

Adv