सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेबरोबरच; दिल्लीत हालचालींना वेग?

81
Adv

, मुंबई: उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबरच होण्याची शक्यता आहे.

योगायोगाने त्याचदिवशी निवडणूक आयोगाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीसंदर्भातील अहवाल तातडीने मागवून घेतला. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनीही दुसऱ्या दिवशी हा अहवाल निवडणूक आयोगाला सादरही केला. त्यामुळे साताऱ्याची पोटनिवडणूक २१ ऑक्टोबरलाच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये यासंदर्भात घोषणा होऊ शकते. 

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. या टीकेला शरद पवार यांनीही चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.  

Adv