प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 18 सप्टेंबर : काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीतील काँग्रेस वॉर रूममध्ये आज बैठक झाली. बैठकीला राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेते सहभागी झालेत. आजच्या बैठकीत जवळपास 50 ते 60 उमेदवारांच्या नावांवरती अंतिम निर्णय घेण्यात आला. पहिल्या 50 उमेदवारांची यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यात येतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण झालं असून प्रत्येक दोन्हीही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर निवडणूक लढविणार असून मित्र पक्षांसाठी 38 जागा सोडणार आहेत