छ उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बैठकीचे आयोजन..

205
Adv

खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे .या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी दिनांक 13 रोजी दुपारी एक वाजता महायुतीचे सन्माननीय सदस्य व श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूह पदाधिकाऱ्यांची यांची बैठक दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे .असे उदयनराजे मित्र समूह संयोजकांच्या वतीने माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर यांनी कळवले आहे

खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या 24 फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसाचे साताऱ्यात उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने नियोजन सुरू आहे .सातारा शहरासह जिल्ह्यात या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचे नियोजन आणि या कार्यक्रमांच्या जबाबदारीचे वाटप याकरिता छ उदयनराजे मित्र समूहाची बैठक दुपारी एक वाजता होत आहे .ही बैठक सातारा लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या बैठकीला सर्व छ उदयनराजे मित्र समूह सदस्य समर्थक आणि महायुतीच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Adv