काँग्रेसची पहिली यादी जाहीर,दक्षिणचा निर्णय राखून ठेवला

75
Adv

काँग्रेसने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.कराड- दक्षिणचा निर्णय राखून ठेवला

काँग्रेसने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह 51 नावांचा समावेश आहे. डॉ. विश्वजित पतंगराव कदम पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून आणि आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहर (मध्य) येथून उमेदवारी घोषित करण्यात आली. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून रमेश बागवेंना भोरमधून संग्राम थोपटेंना, पुरंदरमधून संजय जगताप यांना तर जत विधानसभा मतदारसंघातून विक्रम सावंत काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे.
काँग्रेस आपली पहिली यादी 20 सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचं आधी म्हटलं जात होतं. त्यानंतर 21 तारखेला विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे 23 सप्टेंबरला पहिली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला, मात्र तोही अखेर लांबला. आता पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Adv