सप्ततारा सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम कौतुस्कास्पद ऍड. महेश कुलकर्णी

81
Adv

प्रत्येकाला आरोग्याची काळजी घेणे आज काळाची गरज बनली आहे. आर्थिक मागास आणि दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबाकरता केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा, इतर प्रभागात अशी शिबीरे राबवण्यात यावीत, असे आवाहन माजी उपनगराध्यक्षा सौ. दीपाली गोडसे यांनी केला. दरम्यान, सप्ततारा सांस्कृतिक मंडळ व मित्र समुह हे विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. कौतुकास्पद कार्य या मंडळाचे आहे, असे मत जिल्हा सरकारी वकील ऍड. महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

सप्ततारा सांस्कृतिक मंडळ व मित्र समुह यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे, सुरेश दिवशीकर, भालचंद्र भणगे, बापूसाहेब उथळे, सौ. निशा लोहार, सामाजिक कार्यकर्ते राजू गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. ऍड. महेश कुलकर्णी म्हणाले, सप्ततारा मंडळाचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. आज आपल्याकडे पाहिले असता गोरगरीब गरजू लोकांना त्यांच्या पैशाअभावी उपचार करता येत नाही. शासनाच्या योजना आहेत. परंतु त्या योजना तळागाळात माहिती नसल्याने त्या पोहचत नाहीत. अशी शिबिरे आयोजित केल्याने मुळच्या प्रवाहातल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकतो, असे सांगितले. दीपाली गोडसे म्हणाल्या, ही योजना आर्थिक मागास व दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. गरीबांना मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहे. ज्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा वैद्यकीय तपासणी असल्यास मोफत उपचार, नवजात बालकांवर उपचारांसह अन्य सेवांचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत योजनेतंर्गत 1300 प्रकारच्या सर्जिकल व मेडिकल उपचार केले जातात. या योजनेतंर्गत लाभ घेणाऱयांना एक रुपयाही खर्च करावा लागत नाही, असे त्यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय दाभोळकर, चैतन्य मोहिते, मंगेश लाटकर, सुरेश शिंदे, शिवराज मोरे, मुकूंद जंगम, धीरज शिंदे, प्रणव बाचल, सागर जंगम, दीपक भट्टड, सुभाष काटवे, आकाश लाटकर यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन राजू गोडसे यांनी केले तर आभार दीपाली गोडसे यांनी मानले.

Adv