सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दोन अधिकाऱ्यांमुळे पूर्ण जिल्हा बँकेचे बदनामी चालू असून या बदनामी प्रकरणी दिग्गज संचालक मंडळ गप्प असल्याने या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे हे संचालक तर नाहीत ना अशी कुनकून जाणवते
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह दोन अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने जिल्हा बँकेची पूर्णता बदनामी झाली जिल्हा बँकेवर दोन मंत्री खासदार आमदार असे जम्बो संचालक मंडळ आहे तरी देखील या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही जिल्हा बँक आता फक्त बदनामी साठीच राहिली की काय अशी शंका उपस्थित होत आहे त्याला कारण ही फक्त संचालक मंडळच जबाबदार असल्याचे दिसून येते
शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा बँकेकडे बघितले जाते फार मोठा विश्वास या बँकेवर आहे मात्र काही निवडक तीन अधिकाऱ्यां मुळे बँकेची पूर्तीपद खालावली त्यामुळे दिग्गज संचालकांनी यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे
मुदतवाढ दिलेल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यामुळे बँकेची मानहानी होतीय या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू असून संचालक मंडळ गांधारीच्या भूमिकेत का आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय






