Wednesday, July 8, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District शिस्तप्रिय जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपच्या नेत्यांना शिस्त लावणार का

शिस्तप्रिय जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपच्या नेत्यांना शिस्त लावणार का

129
Adv

खंडाळा पंचायत समितीत विविध विभागाची आढावा बैठक पार पडली मात्र या विभागांमध्ये सर्वांना समान न्याय द्यायचं काम अध्यक्षांचे होते मात्र भाजपच्या काही स्वयंघोषित नेत्यांना स्वतःच्या लाईनीत बसवल्याने नक्की बैठक भाजपची होती का आढावा बैठक हे कळायला मार्ग नाही

आढावा बैठक घेऊन संबधीत प्रश्नांची सोडवणूक करणे हे पदाधिकाऱ्यांचे काम असते मात्र पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आपल्याला कुठलाही पदाचा अधिकार नसताना आपण फक्त पक्षाचे सदस्य आहोत म्हणून पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या लाईन मध्ये बसणं हे कितपत योग्य त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिस्तप्रिय अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी या चमकोगीरांना आवर घालण्याची गरज आहे

जिल्हा परिषदेत यशवंत विचार जपणे फार गरजेचे असून भारतीय जनता पार्टी प्रवेश केला म्हणजे आपण राष्ट्रीय लेव्हलचे नेते झालो असेच काही जण समजायला लागलेले आहेत त्यामुळे शिस्तप्रिय असलेल्या भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी सर्वांनाच शिस्त लावण्याची गरज आहे

Adv