Friday, August 21, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (शरदचंद्र पवार पक्ष) कार्यकारिणी बरखास्त

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (शरदचंद्र पवार पक्ष) कार्यकारिणी बरखास्त

109
Adv

​सातारा: राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील संघटन बांधणीला अधिक गतिमान करण्यासाठी विद्यमान तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि त्यांची तालुका कार्यकारिणी तसेच जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
​जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात लवकरच नवीन तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि त्यांच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा केली जाणार आहे. नवीन निवडी होईपर्यंत जुन्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करू नये, असे आवाहनही या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.
​दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेत सक्रिय काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील तरुण व युवकांनी सातारा येथील ‘राष्ट्रवादी भवन’ येथे थेट संपर्क साधावा आणि नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष समीर घाटगे यांनी केले आहे.

Adv