Sunday, July 12, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City प्रभाग ७ ला मोठा दिलासा; कोटेश्वर टाकीसाठी कास धरणावरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू

प्रभाग ७ ला मोठा दिलासा; कोटेश्वर टाकीसाठी कास धरणावरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू

157
Adv

प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे कोटेश्वर पाणीटाकीसाठी कालपासून कास धरणावरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगरसेविका सौ. वनिता विक्रम शिंदे यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा, बैठका आणि आवश्यक पाठपुरावा करत हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
या कामासाठी छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि छ. उदयनराजे भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि पाणीपुरवठा सभापती बनकर यांनीही मोलाचे सहकार्य करत हा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, वनिता शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कोटेश्वर येथील नवीन पाण्याची टाकीही लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. ही टाकी सुरू झाल्यानंतर प्रभाग ७ मधील नागरिकांना अधिक नियमित, सुरळीत आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
या विकासकामामुळे प्रभाग ७ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत.

Adv