Friday, August 21, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जलमंदिर येथे महिला नगरसेवकांच्या प्रश्नांवर बैठक संपन्न

जलमंदिर येथे महिला नगरसेवकांच्या प्रश्नांवर बैठक संपन्न

269
Adv

सातारा पालिकेच्या येणाऱ्या सभेच्या अनुषंगाने व स्थायी समितीच्या पार्श्वभूमीवर महिला नगरसेवकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जलमंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीस उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर तसेच महिला नगरसेविका नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बैठकीत महिला नगरसेवकांच्या प्रभागांतील विविध अडीअडचणी विकासकामे तसेच नागरिकांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले.

खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या गटाकडे महिला नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या प्रभागांतील प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. आगामी स्थायी समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने समन्वय साधण्याच्या दृष्टीनेही या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Adv