Wednesday, July 8, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District किल्ले प्रतापगड येथील छ शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्याची सोय करा

किल्ले प्रतापगड येथील छ शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्याची सोय करा

557
Adv

सातारा, प्रतिनिधी :
किल्ले प्रतापगड येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर नियमितपणे पुष्पहार अर्पण केला जात नसल्याबाबत महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. ऋतूजा विराज शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्रिया शिंदे यांना पत्र लिहिले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास रोज पुष्पहार घालण्या साठी सोय करावी अशी मागणी त्यांनी केली

सदर पत्रात म्हटले आहे की, किल्ले प्रतापगड येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर नियमित पुष्पहार अर्पण केला जात नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेमार्फत या कामासाठी पंचायत समिती महाबळेश्वर यांना दरवर्षी सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. तरीही प्रत्यक्षात रोज पुष्पहार घातला जात नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे सदरचा हार हा पुतळ्याच्या पायथ्याला घालण्यात येतो

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन नवीन स्टँड तयार करून दररोज पुष्पहार अर्पण करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ही मागणी सौ. ऋतूजा विराज शिंदे यांनी अधिकृत पत्राद्वारे केली आहे.

Adv