शिधापत्रिकेसाठी पिंपोडे बु. येथे उडाली झुंबड…. राजस्व अभियानास उत्तम प्रतिसाद , ग्रामपंचायत व पुरवठामार्फत आयोजन

120
Adv

ग्रामपंचायत पिंपोडे बु. आणि कोरेगाव तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने पिंपोडे बु. येथे राजस्व अभियान राबवण्यात आले त्यात शिधापत्रिका दुरुस्ती , नवीन , दुबार नोंदणीसाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

शिधापत्रिका काढण्यासह त्यातील विविध दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागू नये यासाठी कोरेगाव पंचायत समिती उपसभापती श्री. संजय साळुंखे जि प सदस्य व कृषी सभापती मंगेश धुमाळ सरपंच व उपसरपंच यांच्या प्रयत्नातून या अभियानाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी गावातच शिधापत्रिकेसाठी राजस्व अभियान राबविण्यात आले. प्रांतआधिकारी किर्ती नलवड़े,व तहसिलदार रोहीनी शिंदे यांचे मार्गदर्शना खाली पुरवठा अधिकारी पवार एच जी, साहेब , पुरवठा लेखापाल बोतालजी एस ०ही,बापू खरात, घोरपडे , आडेकरी यांच्या पथकाने पिंपोडे बु. येथे शिधापत्रिका कार्डची दुरुस्ती , नवीन , दुबार , स्थलांतरित , नाव कमी करणे , नाव दाखल करणे, ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्युक कागदपत्रांचे अर्ज स्वीकारुन त्यावर कार्यवाही केली. तलाठी सावंत एस.के , धान्य तसेच परवानाधारक विक्रेते सहभागी झाले होते. अभियान यशस्वीसाठी सरंपच नैनेश कांबळे , उपसरपंचअमोल निकम ग्रा पं सदस्य धनसिंग,सुधिर सांळुखे,अमृतराव जायकर,विकास साळुंखे गजानन महाजन ,मंडलाधिकारी डोईफोडे,ग्रामसेवक कांबळे,व विविध गावचे तलाठी व परीसरातील सर्व रास्त भाव दुकानदार यांनी परिश्रम घेतले.यावेळी बॅक ऑफ महाराष्ट चे शाखा प्रबंधक,कृषी आधिकारी,व रास्त भाव दुकानदार राजेंद्र भोईटे,अक्षय महाजन,प्रविण भोईटे,चेतन भोईटे,प्रकाश शिंदे,पवार मॅडम,अशोक सावंत उपस्थित होते

Adv