पार्थ.. लंबी रेस का घोडा आ नितेश राणे ,शरद पवारांनी नातुला फटकारले

46
Adv

मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी असं वक्तव्य केलं होत. पार्थ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व शरद पवार यांचे नातू असल्याने त्यांच्या या विधानाची माध्यमांकडून दखल घेण्यात आली. अशातच आज शरद पवार यांनी पार्थ यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘मी माझ्या नातूच्या बोलण्याला काडीचीही किंमत देत नाही’ असं म्हंटल होत.

शरद पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवार यांच्याबाबत एक भाकीत केलं आहे. राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून, “आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!” असं ट्विट करत पार्थ यांच्या भवितव्य उज्वल असेल असं भाकीत केलं आहे.

आज परत सांगतो..

पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!!

थांबू नकोस मित्रा !!

Adv