पाचगणीच्या नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांना विमा कवच

113
Adv
जाहिरात

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणी नगरपालिका कर्मचारयंना विमा कवच व सानुग्रह सहाय्य योजना लागू करण्याचा निर्णय पालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. तसेच नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांसह अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारांचे कर्मचारी, मानधनावरील कर्मचाऱ्यांनाही विमा कवच देण्याचा निर्णय पाचगणीच्या विशेष सभेमध्ये घेण्यात आला.
शासनाच्या आदेशानुसार करोनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना अप्रिय घटना घडल्यास विमा कवच व सानुग्रह सहाय योजना लागू करण्याचे आदेश आहेत.

पाचगणी पालिकेत मात्र अध्यक्ष व सर्व सदस्यांसह सर्व कर्मचारी व अधिकारी अहोरात्र काम करत असल्यामुळे त्यांना विमा कवच देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नगरपालिकेकडून विमा उतरवण्याची कार्यवाहीकरण्यात यावी, असा निर्णय विशेष सभेत घेण्यात आला. ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांचे विम्याचे हप्ते पालिकेमार्फत भरण्यात यावेत आणि नंतर ठेकेदारांच्या बिलातून या हप्त्यांच्या रकमेची दरमहा कपात करण्यात यावी व ती रक्कम नगरपालिका फंडात भरण्यात यावी. यासाठी शासन मान्यताप्राप्त विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याबाबत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

Adv