वैशाली शिंदे मेकअप स्टुडिओ चे वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

347
Adv

वैशाली शिंदे मेकअप स्टुडिओ व अकॅडमी हे दालन उदयोन्मुख उद्योजक महिलांसाठी नक्की मार्गदर्शक ठरेल, याचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्ष वेदांतिका राजे भोसले यांनी केले .

येथील सोमवार पेठेमध्ये शीतल झेरॉक्स च्या खाली सुरू झालेल्या अद्ययावत वैशाली शिंदे मेकअप स्टुडिओ व अकॅडमीचे शानदार उद्घाटन झाले यावेळी मान्यवर Z P सदस्या सुनीता कदम उपस्थित होत्या. श्री छ सौ वेदांतिकाराजे पुढे म्हणाल्या,महिला उद्योजक व गृहिणींना वैशाली शिंदे मेकअप च्या माध्यमातून मोठे दालन निर्माण झाले आहे या व्यवसायात क्रियाशीलतेला प्रचंड वाव आहे महिलांनी धडाडीने या व्यवसायात येण्याचे आवाहन वेदांतिका राजे यांनी केले .

वैशाली शिंदे बोलताना म्हणाल्या, शाहूनगर येथे माझे सलोन गेल्या पंधरा वर्षापासून सुरू आहे सातारा शहरात मेकअप दालन सुरू करण्याची महिलांची मोठी मागणी होती म्हणून मेकअप स्टुडिओ व अकॅडमी काढण्याचा निर्णय घेतला हा स्टुडिओ सोमवार पेठेतील शीतल झेरॉक्सच्या खाली सुरू झाला आहे तसेच पुणे मुंबईत चालणारे ऍडव्हान्स मेकअप ,ब्युटी ,हेअर कोर्सेस साताऱ्यात स्टुडिओत उपलब्ध होणार असून या व्यवसायात चालणाऱ्या परीक्षासाठी आपण स्वतः मार्गदर्शन करणार असल्याचे सौ वैशाली शिंदे यांनी सांगितले यावेळी मृणालिनी कोळेकर, स्वाती ओक, काका धुमाळ,यांनी नवीन सदनास शुभेच्छा दिल्या .

Adv