Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City पालिकेतल्या गुडगुडी बाबाला अखेर मुख्याधिकाऱ्यांची नोटीस चोवीस तासात खुलासा करण्याचे आदेश

पालिकेतल्या गुडगुडी बाबाला अखेर मुख्याधिकाऱ्यांची नोटीस चोवीस तासात खुलासा करण्याचे आदेश

99
Adv

आधी क्वारंटाईन पिरियड चा भंग आणि नंतर राजकीय पावशेर दाखवणाऱ्या आरोग्य विभागाच्या गुडगुडी बाबाला अखेर नोटीस बजावण्यात आली आहे . सातारा नामाने हे प्रकरण धसास लावल्याने पालिकेला कारवाई करण्याची वेळ आली .

फक्त तू मारल्यागत कर मी रडल्यागत करतो असा राजकीय ड्रामा पालिकेत रंगवला जाणार नाही ना याकडे प्रसारमाध्यमांचे बारकाईने लक्ष आहे . गुडगुडी बाबांची दुबई वारी आणि अन्न धान्य कीटवाटपात मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याच्या घटनांचे पालिका वर्तुळात प्रचंड राजकीय पडसाद उमटले आहेत . गुडगुडी बाबाची मिजास सातारनामाच्या परखड आणि दणकट लेखणीने पुरती मोडून काढली . दोन वेळा क्वारंटाईन झालेल्या गुडगुडी बाबाने आपले राजकीय वजन पोवई नाक्यावरून दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या केविलवाण्या प्रयत्नांच्या सुध्दा सातारानामा ने चिंध्या केल्या . सततच्या पाठपुराव्याने प्रशासनावरील दबाव प्रचंड वाढला होता . आरोग्य विभाग प्रमुखांनी गुडगुडी बाबांच्या कारनाम्यांचे सविस्तर अहवालाची टिप्पणी सादर केली होती . तो अहवाल फाईलबंद ठेवण्याची तयारी झाली होती . मात्र जिल्हा प्रशासनाकडून विचारणा झाल्याने पालीकेत धावाधाव झाली . तब्बल पंधरा दिवसाच्या विलंबाने मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी आरोग्य विभागाच्या गुडगुडी बाबाला नोटीस काढून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा येत्या चोवीस तासात करण्याचे आदेश दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे

चौकट-

सातारानामाचे आहे बारकाईने लक्ष

सातारकरांच्या आरोग्याची काळजी वाहणारी यंत्रणा ही पारदर्शी असावी . राजकीय मिजास करून जर कोणी राजकीय तुंबडया भरणार असेल तर ती सातारकरांची प्रतारणा आहे . लक्ष्मी दर्शनातील गांधी बाबा कोणाच्या खिशात किती टक्क्याने जातात याचे सज्जड पुरावे आहेत . उगाचच कोणीही गमजा करू नये , नाहीतर पुढची लेखमाला यापेक्षा स्फोटक असू शकते . गुडगुडी बाबावर नोटीशीची कारवाई झाली यासाठी अनेक सजग सातारकरांनी सातारानामाला मनापासून धन्यवाद दिले आहेत .

Adv