किराणा किट वाटप प्रकरणी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली सातारानामा व नगरसेवकांच्या पाठ पुराव्याला यश आल्याची माहिती नगरसेवक रवींद्र ढोणे यांनी सातारानामा शी बोलताना दिली
नक्षत्र ग्रुप, गोंदवले देवस्थान तसेच विविध संस्था व पक्षाने. सातारा पालिकेला काही टनात अन्नधान्य व किराणा किट दिले होते मात्र नगरसेवकांन कुठेही विश्वासात घेतले नव्हते त्यावेळी नक्की किराणा किट कुणाला वाटले ते कळायला मार्ग नव्हता सातारानामा व नगरसेवकांच्या पाठपुराव्याला आजच्या बैठकीत यश आले असून सातारा शहरातील गरजू कामगार परप्रांतीयांना प्राधान्याने किट वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक रवींद्र ढोणे यांनी दिली
बैठकीला नगराध्यक्ष माधवी कदम उपाध्यक्ष किशोर शिंदे आरोग्य सभापती अनिता घोरपडे मुख्याधिकारी गोरे,महिला बाल कल्याण सभापती सुनिता पवार,नगरसेविका स्मिता घोडके नगरसेवक अशोक मोने अमोल मोहिते रविंद्र ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते
काही नगरसेवकांच्या प्रभागात परप्रांतीय गरजू कामगार बिगारी कामगार अशा लोकांची संख्या जास्त आहे अशा लोकांनाकडे दुर्लक्ष झाले होते इथून पुढे या सर्व लोकांचा विचार करण्यात येणार असून लवकरात लवकर दुर्लक्षित झालेल्यांना प्रथम किट वाटप होणार असल्याचे नगरसेवक ढोणे यांनी यावेळी सांगितले