राज्य मंत्रीमंडळाचे आजचे बैठकीत, शासनाच्या महसूल विभागाची नागेवाडी ता. जि. सातारा येथील सुमारे 42.55
हेक्टर म्हणजेच सुमारे 106 एकर जागा महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याला मान्यता देण्यात
आली. या निर्णयाबद्दल आम्ही राज्यमंत्रीमंडळाचे सातारकरांच्या वतीने अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो,सातारकरांचे स्वप्न सत्यात आणण्यात आम्ही कोठे कमी पडलो नाही याचा अभिमान आहे अश्या शब्दात, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आयटी पार्कला जागा उपलब्ध करुन देण्याच्या शासन निर्णयाचे स्वागत केले आहे.
याविषयी अधिक नमुद करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे
नमुद केले आहे की, ऐतिहासिक सातारा जिल्हा विकसनशीलतेकडून विकासाकडे झेपावत आहे. स्वातंत्र्यानंतर 30-40 वर्षे अकारण दबलेला सातारा जिल्हा गेल्या 30 वर्षात विविध क्षेत्रात विकासाची झेप घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून
माहीती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेवून, रोजगार निर्माण व्हावा, सातारच्या अर्थचक्राला गती मिळावी, इत्यादी लाभ
समस्त सातारकरांना मिळावेत म्हणून सातारा येथे आयटी पार्क उभारण्याचे आमचे गेल्या काही वर्षाचे प्रयत्न आजपूर्ण त्वाकडे जात आहे. याकरीता आमची लिंब येथील जागा देखिल आम्ही राज्यशासनाला आयटी पार्कला देण्याची तयारी दर्शवली होती. तथापि शासनाने महसूल विभागाची जागा आज वर्ग करुन समस्त सातारकरांचा एक नवीन संधी उपलब्ध
करुन दिली आहे.
सध्याचे
डिजिटल आणि माहितीच्या स्फोटाचे युग आहे. जागतिकपातळीवर जग जवळ येत आहे. सातारा
किंबहून पश्चिममहाराष्ट्रातील आयटीक्षेत्रातील बुध्दीमता आणि गुणवत्ता सातत्याने पुण्यामुंबईकडे पळत आहे. मुले
परगावी किंवा परदेशात आणि पालक सातारा जिल्हयात अशी अवस्था आज बहुतांशी कुटुंबात दिसत आहे. आता आयटी
पार्कच नागेवाडी सातारा येथे होत असल्याने, अनेकांना सातारा येथेच रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कौटुंबिक
स्वास्थ्य राखले जाण्याची शक्यता वाढणार आहे. रोजगार निर्मितीमुळे सातारच्या प्रत्येक स्तरातील अर्थचक्राला अधि
गती मिळणार आहे. त्यातुनच प्रत्येक कुटुंबाचा विकास होण्याचे आमचे उदिष्ट साध्य होणार आहे. यापूर्वी साता-यामध्ये छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालय सुरु करण्यात आले आहे, एमआयडीसी येथे शासकीय दूध डेअरीच्या जागेमध्ये ईएसआय हॉस्पिटल सुरु होत आहे. ईएसआय हॉस्पिटल मुळे
कामगार वर्गाला फार मोठा दिलासा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी विदयापिठाचे उपकेंद्र सातारा येथे काही कालावधीत
सुरु होणार आहे. सातारचे विमानतळाची बाब प्रस्तावित आहे. सातारा जिल्हा कारागृह स्थलांतरीत करण्याचे प्रस्तावित
आहे. सातारा जिल्हयात प्रत्येक गावात आमच्यासह सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन विविध प्रकारची लोकोपयोगी विकास कामे मोठया प्रमाणात झाली आहेत आणि सुरु आहेत. त्यामुळेच सातारा जिल्हा विकासाकडे मोठया वेगाने झेपावत आहे, काही वर्षातच ऐतिहासिक सातारा एक सुसंपन्न विकसित सातारा जिल्हा म्हणून ओळखला जावा असे आमचे प्रयत्न सुरु आहेत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमूद केले आहे.






