रणदुल्लाबाद गावातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांनी गावाकडे येणाऱ्या रस्त्यांवर मोठे कळक बांधून गावात येणारी वाटच बंद केली आहे .
या सीमा बंद केल्यामुळे गावात कोणालाच प्रवेश घेण्याची परवानगी नाही . त्यामुळे गावात किंवा गावाबाहेर मोकाट फिरणाऱ्या सगळ्या नागरिकांना चाप बसला आहे. सध्या कोरोनाची लागण वाढत आहे त्यात राज्यात सगळीकडे संचारबंदी केली आहे. याच संचारबंदीचं उल्लंघन रोखण्यासाठी शहरातच नाही तर गावपातळीवरही जोमात प्रयत्न सुरु आहे. रणदुल्लाबाद गाव हे त्याचंच एक उदाहरण
यात सरपंच मंगेश जगताप, पोलीस पाटील दादासाहेब देशमुख,korona कृती समिती गांभीर्य पूर्वक जबाबदारी पार पाडत आहेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र जगताप माजी उपसभापती गुलाब जगताप ग्रामस्थ सर्वांना संचार बंदीचे पालन करा अशा सूचना करत असून.. ग्रामपंचयतीमार्फत प्रत्येक कुटुंबाला sanitizer वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंंदिवस वाढत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात जास्त खबरदारी घेतल्या जात आहे. अनेक सुचना दिल्या आहेत. त्या सुचनांचं गावकरी पालन करताना दिसत आहे.