गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा 104.60 टीएमसी झाला आहे. पुढील काही दिवसात अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्याने धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणाचे वक्री दरवाजे एक फुटाने उघडून नऊ हजार 380 व पायथा वीजगृहातून दोन हजार 100, असे एकूण 11 हजार 449 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. समुद्र किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या बहुतांश भागात पुढील काही दिवसात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या कोयना धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सोमवारी (दि. 12) रात्री 9 वाजता पायथा वीजगृहातून एक हजार 50 क्युसेक पाणी सोडण्यात आले. धरणाचे वक्री दरवाजे मंगळवारी दुपारी एक फुटाने उचलून कोयना नदीपात्रात नऊ हजार 380 कयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.