प्रतापगड ता. महाबळेश्वर या ठिकाणी 3 डिसेंबर रोजी शिवप्रतापदिन तसेच वाई येथे प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने गणपती घाट वाई येथे शिवप्रताप दिन व वीर जिवा महाले पुरस्कार यासह विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत
या कार्यक्रमांमधील व्यक्तीचे वर्तन/हालचाल कशी असावी याकरीता निर्बंध घालणे आवश्यक असल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या सर्व पोलीस अधिकारी यांना 2 ते 4 डिसेंबर या कालावधीत आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.