Wednesday, June 17, 2026
spot_img
Home Satara District Satara City उदयनराजे म्हणाले, थांब, मीच शिडीवर चढतो!

उदयनराजे म्हणाले, थांब, मीच शिडीवर चढतो!

140
Adv

राजवाडा ते बोगदा रस्त्यावर सातारा येथे कला, वाणिज्य महाविद्यालयाजवळ खांबांवर एलईडी बल्ब बसविण्याचे काम गुरुवारी सुरू होते. त्यावेळी शिडीवरून कामगार बल्ब लावण्यास वरती चढला होता. संबंधित कर्मचारी हॅण्डग्लोज न घालताच वरती चढला होता.

काम सुरू असतानाच अचानक एक कार थांबली. त्यातून छत्रपती उदयनराजे भोसले महाराज उतरल्याने उपस्थितांना धक्‍काच बसला. उदयनराजेंनी त्या कर्मचाऱ्याला शिडीवरून खाली उतरवले. हॅण्डग्लोज घातल्याशिवाय वरती चढायचे नाही, सुरक्षिततेचे उपाय करायचे, अशा सूचना केल्या. थांब, मीच शिडीवर चढतो, असे उदयनराजे बोलताच सर्व जण अवाक्‌ झाले! त्यानंतर त्यांनी ‘काम चांगले आहे’ अशी थापही दिली अन्‌ तेथून ते रवाना झालेत.

Adv